मुंबई : कागदाचं विमानही ज्यांनी बनवलं नाही त्यांना विमान बनवण्याची परवानगी दिलीय अशी टीका पवारांनी रिलायन्सचं नाव न घेता केली. हिंदुस्तान एअरॉनॉटीक्स लिमिटेड कंपनीत कामगारांचा देशव्यापी बेमुदत संप सुरू आहे. संपाचा आज पाचवा दिवस आहे. तिथे जाऊन शरद पवारांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने एचएएलबाबत योग्य निर्णय घेतले नाहीत अशी टीका शरद पवारांनी केली आहे. इथल्या कामगारांनी नेहमीच देशाच्या हिताचं काम केलं पण कधी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुखोईची निर्मिती एचएएलने केली आहे. सुखोईचं काम संपलं तेव्हा आम्ही करार वाढवला होता. वेतनवाढीच्या कराराबाबत तातडीने तोडगा काढणं गरजेचं आहे असं ही शरद पवारांनी म्हटलं आहे.