सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास त्यांना जाणता राजा, असे कुठेही संबोधण्यात आलेले नाही. जाणता राजा हा शब्द प्रयोग रामदासांनी वापरला. पण रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, तर जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटले. इतकच नाही तर मी कुठेही मला जाणता राजा म्हणा असं बोललेलो नाही, असे सांगतानाच शरद पवार यांनी भाजप नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांना जोरदार टोला लगावला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्याच्या कोणी काही म्हणो. पण मला त्यावर काहीही बोलायचे नाही. त्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर पुरेसे आहेत, असेदेखील पवार यांनी म्हटले आहे. सातारा जिल्ह्यातील पडळ इथल्या साखर कारखान्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. इथे आल्यापासून सगळे पत्रकार माज्या लागले आहेत. मी कुठेच म्हणालो नाही, मला जाणता राजा म्हणा. 'जाणता राजा' हा शब्द रामदास यांनी आणले. शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास नव्हते तर जिजाऊ या गुरू होत्या, असे पवार म्हणालेत.


शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते, ही कमाल लेखणीची कमाल आहे. छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे. निवडणुकीत तुम्ही लोकांनी गंमत केली. साताऱ्याच्या कोणी काही म्हटलं. पण मला त्यावर काहीही बोलायचे नाही. त्यासाठी रामराजे पुरेसे आहेत, असा टोला त्यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला.