मुंबई : राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झालं आहे. या सरकार स्थापनेनंतर आता भाजपमधून खदखद समोर येतेय. आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे विधान भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. या विधानाचा समाचार आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतला आहे.  


मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं - चंद्रकांत पाटील


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी विविध राजकीय मुद्यावर प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदासदंर्भात मोठं विधान केले होते. या विधानावर शरद पवार यानी दगड डोक्यावर ठेवला की छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे.  



 मुख्यमंत्री शिंदेंना झेड सिक्यरिटी होती 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असताना त्यांना सिक्यूरीटी नाकारल्याचा आरोप शिंदे गटातील आमदार करत आहेत. या आरोपावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. सुरक्षा द्यायचा निर्णय कॅबिनेट घेत नाही, तर सिनियर अधिकारी निर्णय घेत असतात असे त्यांनी स्पष्ट केले आहे, तसेच शिंदेंना झेड सिक्यरिटी होती. ॲडिशनल फोर्सही दिलेला होता, असे शरद पवार यांनी सांगत शिंदे गटाच्या आमदारांचा आरोप खोडून काढलाय.