मी राजकारणात असलो तरी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण करत नाही - शरद पवार
राजकारण आणि खेळ या मुद्यावर जेव्हा शरद पवार बोलतात...
हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : जिल्ह्याच्या शिरूर येथे उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या आखाड्यासाठी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आमदार अशोक पवार,उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्यासह मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते यावेळी बोलताना शरद पवार यांनी
मी प्रकाशशेठचं अभिनंदन करतो आणि थोडी नाराजी ही व्यक्त करतो म्हणतं ते बोलताना म्हणाले,' मी या वयात इतका वेळ बसलो पण मी आजून म्हातारा झालो नाही,असं सांगत शरद पवार यांनी कुस्तीचा आणि माझा जुना संबंध असून हा खेळ सामान्य माणसाने जपला आहे,
मी खेळाच्या अनेक संघटनेत असून राजकारण एका बाजूला आणि क्रीडाक्षेत्र एका बाजूला आहे. मी राजकारणात असलो तरी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण येऊ देत नाही मात्र राजकारणात डाव कुठे टाकायचा हे कुस्तीत शिकलो, असं यावेळी बोलताना पवार यांनी सांगितले,
वाढदिवस प्रकाश धारिवाल यांचा असला तरी आयोजक पैलवान अशोक पवार, या तालुक्याचे आमदार अशोक पवार आणि प्रमुख उपस्थिती शरद पवार त्यामुळे इथे पवारांचं राज्य दिसतंय असं गमतीशीर पने बोलताना पवारांनी सांगितलंय
नवीन नवीन पैलवान तयार होतात यात मला आनंद असून कुस्ती हा सामान्य कुटुंबातील खेळ असल्याचे हि या वेळी बोलताना शरद पवार यांनी सांगितले..