कोल्हापूर : काँग्रेस नेते नारायण राणे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरु आहेत. या चर्चांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला माझ्या शुभेच्छा आहेत, असं शरद पवार म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावरच्या चर्चांवरून पवारांनी चंद्रकांत पाटील यांनाही टोला हाणला आहे. सरकारमध्ये मंत्री कोण असावं किंवा नसावं याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात असा इतिहास आहे पण या घोषणा सध्या कोल्हापुरातूनच होतात, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.


राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपचे नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपद सोडण्याची तयारी दाखवली होती. नारायण राणे यांनी पक्षामध्ये यावं याचं आम्ही स्वागत करतो. पक्षाचा आवश्यकतेपोटी जर माझे बांधकाम खातं त्यांना द्यावं लागलं तरी मी तयार आहे असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं.