Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवार यांचा खुलासा; पहाटेचा शपथविधी 3 वर्षानंतर पुन्हा चर्चेत
शरद पवारांशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी घेतल्याचा देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट. तर शरद पवारांकडून आरोपांचे इन्कार. फडणवीस असत्य बोलत असल्याचा शरद पवार यांचा दावा.
Sharad Pawar reaction On Devendra Fadnavis : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कुणालाही न कळवता भल्या सकाळी राजभवनावर जाऊन केलेला शपथविधी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात सर्वात मोठ गूढ ठरलं आहे. 23 नोव्हेंबर 2019 रोजी झालेला हा पहाटेचा शपथविधी तीन वर्षानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी खुलासा केला आहे (Maharashtra Politics).
शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी केल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. एवढंच नव्हे तर खाते वाटप आणि महामंडळांच्या वाटपाबाबतही शरद पवारांशी चर्चा करण्यात आली होती असंही फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानंतर अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी पुन्हा चर्चेत आला आहे. शरद पवार यांनी यावार खुलासा करताना देवेंद्र फडणवीस यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस खोटं बोलत असल्याचे म्हंटले आहे. असत्याचा आधार घेऊन फडणवीस असं वक्तव्य करतील, असं वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत व्यक्ती आहेत. ते असं वक्तव्य करतील, असं कधी वाटलं नव्हतं. तुम्ही या आरोपांबाबत त्यांनाच विचारा असं शरद पवार म्हणाले.
शिंदे गटाची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदेंच्या बंडावरुन अजित पवारांनी बोचरी टीका केली होती, त्याला आता शिंदे गट आणि भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिंदेंचं बंड महाराष्ट्राला परवडणारं नाही, अशी टीका अजितदादांनी केली होती. त्यावर पहाटेचा शपथविधी हे बंड होतं की गद्दारी असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी केलाय तर पहाटेच्या शपथविधीवेळी आपणच एकत्रच होतो अशी आठवण गिरीश महाजनांनी अजित पवारांना करुन दिली.