Ramdas Athawale on Sharad Pawar: राज्यातील सत्तासंघर्षानंतर राज्याच्या राजकारणाला (Maharastra Politics) वेगळं वळण येत असल्याचं पहायला मिळतंय. तीनवेळा सरकार आलं, मुख्यमंत्री शपत झाली, तरी देखील अस्थिरता कायम असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता कायमचा तोडगा निघावा, अशी अपेक्षा केला जात आहे. अशातच आता केंद्रीय मंत्र्याने थेट शरद पवार (Sharad Pawar) यांना एनडीएसोबत (NDA) येण्याची ऑफर दिली आहे.


काय म्हणाले Ramdas Athawale?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांनी आता एनडीए सोबत यावं, असं खुली ऑफर रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली आहे. नागालँडप्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीए सोबत येण्याचं आवाहन आठवलेंनी दिलं आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. मोदींच्या यांच्याकडून पवार यांचे अनेक वेळा कौतूक झालंय, असं रामदार आठवले (Ramdas Athawale on Sharad Pawar) म्हणाले आहेत.


आठवलेंचा राज ठाकरेंना सल्ला (Ramdas Athavale on Raj Thackeray)


राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत. राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा वाढवू नये, भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कश्या लावता येतील ते बघावं, भोंग्याना विरोध करू नये. राज ठाकरे यांनी चांगलं काम करून आपला पक्ष वाढवावा, असा सल्ला देखील रामदास आठवले यांनी दिलाय.


उद्धव ठाकरेच जबाबदार (Ramdas Athawale on Uddhav Thackeray)


बाळासाहेब ठाकरे असते तर उध्दव ठाकरे यांच्यावर ही वेळ आली नसते. शिवसेना घालवण्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे जबाबदार असल्याचं वक्तव्य देखील रामदास आठवले यांनी केलंय.


आणखी वाचा - Uddhav Thackeray On Rahul Gandhi: भरसभेत उद्धव ठाकरे यांनी टोचले राहुल गांधींचे कान; म्हणाले "येड्या गबाळ्याचं..."


दरम्यान, शिर्डी मधून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी बोलून शिर्डीची जागा मागून घेणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला महाराष्ट्रात 2 जागा मिळाव्यात, अशी इच्छा देखील त्यांनी बोलून दाखवली.