Uddhav Thackeray On Rahul Gandhi: भरसभेत उद्धव ठाकरे यांनी टोचले राहुल गांधींचे कान; म्हणाले "येड्या गबाळ्याचं..."

Uddhav Thackeray Warn Rahul Gandhi: मी राहुल गांधी यांना जाहीरपणे सांगतोय. सावरकरांचा (Savarkar) अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Updated: Mar 26, 2023, 08:50 PM IST
Uddhav Thackeray On Rahul Gandhi: भरसभेत उद्धव ठाकरे यांनी टोचले राहुल गांधींचे कान; म्हणाले "येड्या गबाळ्याचं..." title=
Uddhav Thackeray ,Rahul Gandhi

Uddhav Thackeray Malegaon Sabha Speech: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मालेगावात सभा (Malegaon Sabha) घेतली. त्यावेळी त्यांनी चौफेर टीका केल्याचं दिसून आलं. आता फक्त जिंकेपर्यंत लढायचं, उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. हिंदुत्वावर बोलत असताना त्यांनी थेट राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ठणकावलं. सावकरांच्या (Sawarkar) मुद्द्यावरून हा वाद पेटला होता. त्यावर बोलताना सावरकर दैवत असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

काय म्हणाले Uddhav Thackeray?

ही लोकशाहीची लढाई आहे. पण मी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जाहीरपणे सांगतोय. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. सावरकारांच्या वाड्यात मी लहानपणी गेलो होतो. सावरकरांचं काम येड्या गबाळ्याचं काम नाही. सावकरांनी एकाप्रकारे बलिदान दिलंय. त्यांनी 14 वर्ष यातना सोसल्या. आपण एकत्र आलोय ते संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

आत्ता वेळ चुकली तर देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. सावकरांनी छळ सोसला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिला. सावरकरांचे भक्त असाल तर स्वातंत्र्य टिकवलं पाहिजे. सावरकर आमचे दैवत आहेत, असं म्हणत त्यांनी राहुल गांधी (Uddhav Thackeray On Rahul Gandhi) यांना ठणकावलं आहे.

 

निवडणूक आयोगावर प्रहार

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर तारेशे ओढल्याचं दिसून आलं. आयोगाच्या डोळ्यांत मोती बिंदू झाले नसेल तर खेड आणि मालेगांव ची सभा बघावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी म्हणजे भारत, तुम्हाला मान्य  आहे का? यांच्यासाठी स्वातंत्र्याविरांनी बदिलान दिलं होतं का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय.