राजुरा: अनुच्छेद ३७० आणि महाराष्ट्राचा संबंध काय, असा सवाल करणाऱ्या शरद पवार यांना मतांच्या हव्यासापोटी 'मोतीबिंदू' झाला आहे. त्यामुळे जनतेला काय हवे, हे त्यांना दिसत नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केली. ते शुक्रवारी राजुरा येथील प्रचारसभेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, बाळ गंगाधर टिळक यांची भूमी आहे. याच राज्यातून स्वराज्याचा लढा सुरु झाला. मात्र, आता पवार अनुच्छेद ३७० आणि महाराष्ट्राचा काय संबंध, असा सवाल विचारतात. पवार साहेब तुम्हाला मतांच्या हव्यासामुळे 'मोतीबिंदू' झाला आहे आणि त्यामुळेच तुम्ही लोकांना काय हवे ते पाहू शकत नसल्याचे अमित शहा यांनी म्हटले. 


साताऱ्यात भर पावसात शरद पवारांची सभा


यावेळी अमित शहा यांनी महाराष्ट्रा पुन्हा एकदा आमचंच सरकार येईल, असा दावाही केला. भाजपचे कार्यकर्ते एक दिवस आधीच २४ ऑक्टोबरला राज्यात दिवाळी साजरी करतील. महाराष्ट्रात एकीकडे भाजप जिथे मोदींच्या नेतृत्त्वातील देशभक्तांचा पक्ष आहे तर दुसरीकडे राहुल गांधी आणि शरद पवारांची घराणेशाही असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. 


हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर राहुल गांधी क्रिकेट खेळायला मैदानात