मुंबई : गेल्या वर्षी संपूर्ण जगात हाहाःकार मजवणाऱ्या कोरोना व्हायरसने आतपर्यंत लाखो लोकांचे प्राण घेतले. या धोकादायक विषाणूवर मात करण्यासाठी अनेक देशांनी लस शोधली आहे. शिवाय लसीकरणाला सुरूवात देखील झाली आहे. भारतात आजपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. आता कोरोनावर मात करणारी लस खासगी रूग्णालयात देखील उपलब्ध असणार आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कोरोना प्रतिबंधक लस घेतली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांनी ट्विट करून लस घेतल्याची माहिती दिली. 'आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा.'


असं ट्विट करत त्यांनी इतर ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केलं आहे. शरद पवार हे महाराष्ट्रातील कोरोना प्रतिबंधक लस घेणारे पहिले राजकीय नेते ठरले आहे. शिवाय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.