COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : काँग्रेसनं आज आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला शरद पवार जाणार नाहीत. आज दिल्लीत काँग्रेसतर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये इफ्तार पार्टीपेक्षा विरोधकांचं शक्तिप्रदर्शन होणार आहे. 


उत्तर प्रदेशातून अखिलेश यादव, बिहारमधून तेजस्वी यादव यांना सोबत घेऊन राहुल गांधी भाजप विरोधात युवा फळी उभी करत आहेत. तर ममता बॅनर्जी, मुलायम सिंग, मायावती यांना इफ्तार पार्टीचं आमंत्रण देण्यात आलंय. २०१९ मध्ये काँग्रेस हाच विरोधी पक्षांचा सूत्रधार असेल असा संदेश दिला जाईल. मात्र, शरद पवार या बैठकीला जाणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रफुल्ल पटेल या इफ्तार पार्टीला उपस्थित राहतील. तसंच तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जीही या इफ्तार पार्टीला जाणार नाहीत... तृणमूलतर्फे दिनेश त्रिवेदी उपस्थित राहणार आहेत.  मोदींविरोधात सगळे विरोधक या पार्टीला येत असताना पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरलीय. या पार्टीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे संघाच्या व्यासपीठावर उपस्थिती लावल्यानंतर प्रणव मुखर्जी काँग्रेसच्या या इफ्तार पार्टीला उपस्थित राहणार आहेत. या इफ्तार पार्टीचं कुणाकुणाला आमंत्रण असेल, पाहा वरील व्हिडिओच्या माध्यमातून...