दिल्लीत शेतकऱ्यांचा मोर्चा, पवार विरोधी पक्ष नेत्यांची मोट बांधणार!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीतल्या ३० नोव्हेंबरच्या मोर्चासाठी स्वत: विरोधी पक्षांशी संपर्क साधणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलीय.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीतल्या ३० नोव्हेंबरच्या मोर्चासाठी स्वत: विरोधी पक्षांशी संपर्क साधणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलीय. कोल्हापूरमध्ये शेट्टींनी पवारांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दिल्लीतल्या संसद घेराव आंदोलनाबाबत चर्चा झाली. देशातल्या २२ पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.
आपली बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला दीडपट हमी भाव मिळत असेल तर आपण आघाडीत जाऊ असंही शेट्टी यांनी यावेळी नमूद केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींची भेट घेतलीय. पवारांचा हा दौरा खासगी असला तरी या दौऱ्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकसंदर्भात बऱ्याच राजकीय घडामोडी होतील, असं चित्र आहे.