Sharad Pawar :  शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त बैठकीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहेत. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीतील नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. पुतण्याने काकांना भेटण्यात गैर काय? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. तर, बैठकीत झालेलं सगळ काही सांगायच नसते असं मोठ विधान शरद पवार यांनी केले आहे. 12 ऑगस्ट रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यात एक गुप्त बैठक झाली होती. 


गुप्त बैठकीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी  गुप्त बैठकीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात अजित पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. चोरडियांच्या घरी झालेल्या भेटीत केवळ कौटुंबिक चर्चा झाल्याचा पुनरुच्चार शरद पवारांनी केला. तसंच आपण पक्षाचे सर्वात वरीष्ठ आणि संस्थापक आहोत. त्यामुळे माझ्याशी काय कोण काय चर्चा करणार असा प्रतिप्रश्न केला.


शरद पवार उपस्थित केला. पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून  कुठलाही कौंटुबिक प्रश्न सोडवण्याची माझ्यावर जबाबदारी आहे. घरात लवकरच शुभ कार्य होणार आहे. त्याअनुषंगाने निर्णय घेण्यासंदर्भात माझ्याशी चर्चा केली जाते. यामुळे या बैठकीत काय झाले ते सगळ काही सांगायचं नसत असं शरद पवार म्हणाले.


लाल किल्ल्यावरील भाषणासाठी मोदींनी देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घेतलं


या पत्रकार परिषेदत शरद पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला.  लाल किल्ल्यावरील भाषणासाठी मोदींनी देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घेतलं असेल त्यामुळेच ते पुन्हा येईन म्हटले असतील असा टोला त्यांनी लगावला.


भाजपवर टीका


देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्या भाजप आणि सहकाऱ्यांची भूमिका समाजातून एकवाक्यता संपवण्याची आहे. धर्म समाज, मध्ये विभाजन कसे होईल कटुता कशी वाढेल  याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आम्ही देशपातळीवर 2 सभा घेतल्या, 6 राज्याचे मुख्यमंत्री त्यात होते.  या व्यासपीठाला आम्ही इंडिया नाव दिले, याच इंडिया ची बैठक मुंबईत आहे. दुसऱ्या दिवशी सभा ही असेल. मोदी सरकार विरोधात जनमत दाखवणे आणि पर्याय देणे यासाठी हा लढा आहे. पंतप्रधान मोदी यांना  मणिपूर मध्ये जावे लोकांना विश्वास द्यावा हे महत्वाचे वाटलं नाही. त्यापेक्षा निवडणुकांच्या तयारीचे मीटिंग घेणं त्यांना महत्वाचं वाटले.