अंधेरी पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांची रोखठोक भूमिका, सर्व पक्षांना केलं हे आवाहन!
निवडणूक बिनविरोध करणं योग्य राहिल. महाराष्ट्रात योग्य़ संदेश जाण्याच्यासाठी निवडणूक बिनविरोध करा, असं शरद पवार म्हणाले आहेत.
Andheri Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीचा (Andheri byelection) प्रचार जोरात सुरू झालेला असतानाच नवीन ट्विस्ट आला आहे. भाजपने (BJP) अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये, असं पत्र राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहिलं आहे. त्यामुळं भाजप उमेदवार माघार घेणार का? याची चर्चा आता सुरू झाली आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली.
सध्याची अंधेरीची पोटनिवडणूक ही चर्चेचा विषय आहे. निवडणूक बिनविरोध करणं योग्य राहिल. महाराष्ट्रात योग्य़ संदेश जाण्याच्यासाठी निवडणूक बिनविरोध करा, असं शरद पवार म्हणाले आहेत. ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावं, असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं आहे.
निवडणूक प्रतिष्ठेची करून नये, असं आवाहन देखील शरद पवारांनी भाजप यावेळी केलं. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे म्हणून मी हे आवाहन करतोय. अर्ज मागे घेण्यास अजून वेळ आहे, त्यामुळे मी हे आवाहन करतोय, असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
महापालिकाने ऋतुजा लटके यांच्याबाबत योग्य निर्णय घेतला असता तर न्यायालयात जाण्याची गरज लागली नसती, असंही पवार म्हणाले आहेत.