शरद पवारांचा सातारा दौरा, बंदोबस्तात असलेल्या वाहतूक पोलीसाचा हृदविकाराच्या धक्क्याने मृत्यू
शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात महामार्गावर नियुक्त असलेल्या एका वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असताना या वाहतूक पोलिसाला हृदयविकाराचा झटका आला.
Sharad Pawar at Satara : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर सोमवारचा दिवस राष्ट्रवादीसाठी (NCP) आणि राष्ट्रवादीच्या प्रमुखपदी असणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar यांच्यासाठी महत्तावाचा होता. शर पवार आज सातारा (Satara) दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली. शरद पवार सातारा दौऱ्यावर येत असल्याने महामार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक पोलिसांना (Traffic Police) नियुक्त करण्यात आलं होतं.
दरम्यान शरद पवारांचा दौऱ्यासाठी महामार्गावर नियुक्त केलेल्या वाहतूक विभागाच्या पोलिस कर्मचार्याचा दुर्देवाने मृत्यू झाला. सोमनाथ शिंदे (Somnath Shinde) असं या वाहतूक पोलिसाचं नाव असून त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झालं. सोमनाथ शिंदे हे सातारा शहर वाहतूक शाखेत कार्यरत होते. आज कर्तव्यावर असताना रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका झाला. सोमनात शिंदे यांना तात्काळ जवळच्या रुग्णायात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सोमनाथ शिंदे यांच्या मृत्यूने सातारा वाहतूक पोलीस शाखेत हळहळ व्यक्त केली जात आहे.
दौऱ्यात पवारांचं स्वागत
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार ऍक्शन मोडमध्ये आलेयत...शरद पवार कराड दौ-यावर आहेत. पुण्याहून कराडकडे जाताना पवारांचं कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं. खेड शिवापूर टोलनाक्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. तर साता-यातील वेळेमध्ये शरद पवारांचं आमदार मकरंद पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. यावेळी मकरंद पाटील पवारांच्या बाजुला बसलेले होते.
शरद पवारांचा इशारा
आपल्याला तरुणांचा प्रचंड पाठिंबा मिळतोय, त्यांना योग्य दिशा दिली तर ३ महिन्यांत राज्याचं चित्र बदलेल, असं पवारांनी म्हटलंय. त्याचबरोबर अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे, असंही पवारांनी साता-यातल्या पत्रकार परिषदेत म्हटलं. तसंच काँग्रेसची विरोधी पक्षनेत्याची मागणी रास्त असल्याचंही ते म्हणाले.
काय म्हणाले पवार
चार वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभेतदेखील हेच चित्र होते. पण राज्यात जिथे जाता येईल तिथे जाणे, आपली भूमिका मांडणे हे केले त्याचा परिणाम आमची संख्या वाढली आणि आम्ही संयुक्त सरकार स्थापन केले. आज पुन्हा ती स्थिती आहे. या सर्व स्थितीत अनेकजण संपर्क करून आपण सर्व एक आहोत, आमची तुम्हाला साथ आहे, असं शरद पवार म्हणाले पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहेत. पहिली सभा दिलीप वळसे यांच्या मतदारसंघात घेणार असून दुसरी सभा धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात घेणार आहेत. दौऱ्याची सुरूवात शिवनेरीपासून करणार आणि शेवट रायगडवर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.