सेंट अँथनी कॉन्व्हेंट शाळेची विद्यार्थिनी शर्वरी संघपाल राऊत हिने राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. Wiz International Spelling Bee ने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ही संस्था सुंदर हस्ताक्षराला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखली जाते. या क्षेत्रातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणारी ही संस्था दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करत देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना आकर्षित करत असते. तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराची पाहणी करत त्यातून निवड केली जाते. या राज्यस्तरीय स्पर्धेत शर्वरी राऊत जिंकली असून आता ती राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकालाच आपलं अक्षर सुंदर असावं असं वाटत असतं. याचं कारण सुंदर हस्ताक्षर आपल्या व्यक्तिमत्वाचाही भाग असतो. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात संगणक, मोबाईल यांचा जास्त वापर होत असल्याने हाताने लिहिण्याची वेळ किंवा संधी फार कमीच असते. त्यामुळे सुंदर हस्ताक्षर ही संकल्पना कुठेतरी हरवत चालली आहे. पण अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना वाव आणि शाबासकी असं दोन्ही मिळतं. शर्वरीने पहिला नंबर मिळवल्यानंतर तिचं कौतुक होत आहे. 


करोनामुळे तर अनेक विद्यार्थ्यांची नियमितपणे लिहिण्याची सवय सुटली आहे. त्यामुळे 2021 मध्ये संस्थेने या स्पर्धेचं स्वरुप वाढवलं. संस्थेच्या विदर्भातील समन्वयक मोनाली लोणकर यांनी सांगितलं आहे की, संस्था स्पेलिंग, उच्चार हेदेखील चांगले व्हावेत यासाठी प्रयत्न करतात. 



संस्थेने नुकतंच पुरस्कार विजेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते शर्वरीचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी इतर मान्यवरही उपस्थित होते. शर्वरीनेदेखील यावेळी आपल्या भावन्. व्यक्त करताना माझी आजी प्रेरणास्थान असल्याचं सांगितलं.


'माझी आजी माझं प्रेरणास्थान असून कुटुंबाचा आधार आहे. माझ्या कुटुंबाने मला लहानपणापासूनच चांगल्या आणि सुंदर हस्ताक्षरासाठी प्रेरणा दिली आहे. मी या स्पर्धेत आपल्या आजीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत,' असं ती म्हणाली.