Indurikar Maharaj Mother in Law : प्रसिद्ध  किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासू(Indurikar Maharaj Mother in Law ) सरपदाची निवडणुक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ग्राम पंचायत निवडणुकीत इंदुरीकरांच्या सासू शशिकला पवार(Shashikala Shivaji Pawar) यांनी विखे पाटील आणि थोरातांच्या गटाला पराभवाचे पाणी पाजले. इंदुरीकरांच्या सासू शशिकला पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. यानंतर आता शशिकला पवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगमनेर तालुक्यात निळवंडे ग्रामपंचायतीत (Nilwande Gram Panchayat) इंदुरीकरांच्या सासू शशिकला पवार या निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या होत्या. दिग्गज नेत्यांना धक्का देत  ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणती विजय मिळवत शशीकला  थेट सरपंचपदी विराजमान झाल्या. इंदुरीकर यांच्या सासूबाई  शशीकला यांच्या विजयाची राजरीक वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. सरपंचपदाची निवडणूक जिंकल्यानंतर शशिकला पवार कोणत्या पक्षात जाणार? याबाबत देखील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. 


भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत जाण्याची भूमिका शशीकला पवार यांनी जाहीर केली. यामुळे त्या भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे विखे पाटील गटाचाच शशीकला यांनी निवडणुकीत पराभव केला होता. गावाच्या विकासासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत जाऊ अस वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्या भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


वादग्रस्त वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराज नेहमी चर्चेत? ( Who is Indurikar Maharaj? ) 


ग्रामपंचायत निवडणुकीत घराघरातून उमेद्वार उभे केले जातात. इंदोरीकर महाराज हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार आहेत.  आपल्या मिश्किल अंदाजात इंदोरीकर महाराज कीर्त सांगतात. इंदोरीकर महाराजांचं मूळ नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे मुळ गाव आहे.  गावाच्या नावावरूनच त्यांना 'इंदोरीकर महाराज' असं नाव पडलं.


इंदोरीकर महाराज महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार असून ते आपल्या किर्तानातून समाज प्रबोधन करतात. इंदोरीकर यांच्या कीर्तानाचे छोटे क्लिप सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतात. अनेक जण त्यांच्या किर्तीनाच्या क्लीपवर मिमीक्री देखील करतात. कीर्तनासह इंदोरीकर महाराज हे वादग्रस्त वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात.