शिखर बँक प्रकरणी आक्षेप घेतला? अण्णा हजारे म्हणतात, `मला काही कल्पना नाही`
Anna Hajare On Shikhar Bank Scam: शिखर बॅंक क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आले होते. पण अण्णा हजारेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Anna Hajare On Shikhar Bank Scam: लोकसभा निवडणुकीपूर्वी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता होती. कारण आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आले होते. पण अण्णा हजारेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. या विषयी आपल्याला काही कल्पना नव्हती असे ते म्हणत आहेत. काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
शिखर बँक प्रकरणातील आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला होता. मात्र आक्षेप कोणी घेतला हेच आपल्याला माहीत नसल्याचं अण्णांनी म्हटलं आहे. शिखर बँक घोटाळ्याला तेरा चौदा वर्ष झाले. त्यामुळे त्याच काय झालं मला काहीही कल्पना नाही. काल माझं नाव समोर आल ते बघितल्यानंतर माझं नाव कसं आल जे करायचं होतं मला विचारून करायला पाहिजे. मात्र जे माझं नाव आल त्याबाबत मला कोणतीही कल्पना नाही असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.
माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साध्य करतात, असे स्पष्टीकरण अण्णा हजारे यांनी दिले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला होता. न्यायालयाने त्यांचा हा आक्षेप मान्य केला असे वृत्तही समोर आले होते. याबद्दल निषेध याचिका दाखल करण्यासाठी अण्णा हजारे यांना वेळ देण्यात आला होता. गुरुवारी 13 जूनला विशेष सत्र न्यायालायचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. याप्रकरणाची पुढील सुनावणी 29 जूनला होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणी दरम्यान कोर्ट काय भूमिका घेतेय हे पहावं लागणाराय. दरम्यान आक्षेप घेताना अण्णा हजारेंच्या नावाचा दुरुपयोग झालाय? खरच त्यांना याबद्दल माहिती नव्हती? अण्णा हजारेंच्या नावाचा दुरुपयोग करुन कोणी खोडसाळपणा केला? आता या केसमध्ये पुढे काय घडणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.