नवी दिल्ली : Shinde group new election symbols : शिंदे गटानं निवडणूक आयोगाला  ई-मेलद्वा चिन्हांचे पर्याय पाठवले आहेत. निवडणूक आयोगाने शिंदे गटाची तीनही चिन्हं नाकारल्यावर आता शिंदे गटाला नव्या चिन्ह्यांची यादी सकाळी 10 पाठवायची होती. त्यानुसार शिंदे गटाने ई-मेल करत तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड ही चिन्हं निवडणूक आयोगाला सादर केली आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाला कोणते चिन्हं मिळणार याची उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाने निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवले आहेत. तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचं झाड असे तीन पर्याय शिंदे गटाने आयोगासमोर दिले आहेत. शिंदे गटाला चिन्हं देण्याची मुदत होती. त्याआधी शिंदे गटाने ई-मेलद्वारे हे तीन पर्याय पाठवले आहेत. 



केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ''शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे'' असं नाव वापरायला परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. 


दरम्यान, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी पक्ष चिन्ह म्हणून 'त्रिशूळ'चा आग्रह धरल्याने, तसेच थेट धार्मिक बाबींशी संबंध असल्याने शिंदे गटाला त्रिशूळ मिळाला नाही. उगवता सूर्य चिन्हं हे डीएमकेचं चिन्हं आहे. तर 'गदा' ही थेट धार्मिक बाबीशी संबंधित असल्याने नाकारली गेली आहे. दोन्ही गटांना नावेही देण्यात आली आहे. ठाकरे गटाचं नाव 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' असं करण्यात आले आहे. तर शिंदे गटाचं नाव 'बाळासाहेबांची शिवसेना' असे देण्यात आलंय. सहा चिन्हांपैकी केवळ एका चिन्हाला मान्यता देण्यात आली आहे.