संभाजीनगरमध्ये शिंदे गटाची ग्रामपंचायत निवडणुकीत सरशी
Vadgaon Kolhati Gram Panchayat : ग्रामपंचायत निवडणुकीचे काही निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. संभाजीनगरात ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने खातं उघडले आहे.
संभाजीनगर : Vadgaon Kolhati Gram Panchayat : ग्रामपंचायत निवडणुकीचे काही निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. संभाजीनगरात ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने खातं उघडले आहे. येथील 8 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाची आघाडी दिसून येत आहे. येथे शिंदे गट आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळाली.
संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत निवडणुकीत 17 पैकी 7 जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि शिवसेनेत ही थेट लढत होती. पैठणमध्ये भुमरे गटाने 7 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.
शिंदे गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा झेंडा उभारला आहे. संभाजीनगर च्या 16 ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गट आघाडीवर आहे. प्रामुख्याने सगळ्यात जास्त उत्सुकता आहे, ती वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीची. शहराजवळ असल्याने, आणि एमआयडीसीचा भाग असल्याने श्रीमंत ग्रामपंचायत आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांचा वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायती भाग मानला जातो. त्यामुळे संजय शिरसाठ यांचा पॅनल आणि शिवसेनेमध्ये थेट लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता शिंदेगटाने 17 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. तर पैठणमध्ये भुमरे गटाने 7 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.