Shiv Sena Crisis Sanjay Raut In Trouble : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना (shivsena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातातून गेले आहे. शिवसेना पक्ष ताब्यात आल्याने शिंदे गटाची ताकद वाढली आहे. शिवसेनेतील महत्वाच्या पदांवर देखील शिंदे गटाकडून दावा करण्यात येत आहे.  शिंदे गटाकडून तशा प्रकारच्या हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे.  त्यातच आता संजय राऊत यांचे मुख्यनेते पद काढून घेतले जाणार आहे (Sanjay Raut In Trouble). तशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे (Maharashtra Politics). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधीमंडळ पक्षानंतर आता संसदीय पक्ष देखील शिंदेकडे जाणार आहे. संजय राऊतांचे मुख्यनेते पद काढून घेतले जाणार आहे. गजानन किर्तीकर यांची संसदेच्या मुख्य नेते पदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  औरंगाबादचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) हे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आहेत. ते ठाकरे गटाचे आहेत.  शिंदे गटाकडून शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपैकी विधानपरिषद सभागृह गटनेते म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. शिंदे गटानं तसा व्हीप जारी केल्यास या हालचालींना वेग येऊ शकतो. 


शिंदे गटाच्या नेत्यांची प्रतिक्रिया


संसद अधिवेशनाबाबत संजय राऊत यांनी व्हीप झुगारला तर त्यांचंच निलंबन कसं होईल याची कारवाई आम्ही करणार आहोत असं आमदार संजय शिरसाट म्हणाले. राऊतांच्या अपात्रतेबाबत कारवाई खासदार पाहून घेतील असं म्हणत शिदे गटाचे प्रवक्ते  भरत गोगावले यांनी देखील याला दुजोरा दिला.


शिवसेना चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा


शिवसेना चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2 हजार कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले असा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केला आहे. हा प्राथमिक आकडा असून 100 टक्के सत्य असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला. त्यांच्या या आरोपांवर शिंदे गटाच्या नेत्यांसह भाजप नेत्यांनी देखील  पलटवार केला आहे. संजय राऊत हे शिंदे गटाच्या नेत्यांसह भाजप नेत्यांवर सातत्याने टीका करत आहेत. अत्यंत खालच्या पातळीच्या भाषेत ते टीकास्त्र सोडत आहेत. 


संजय राऊत यांच्याविरोधात नाशिक, पुणे आणि ठाण्यात गुन्हा दाखल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टीका करणं संजय राऊत यांना महागात पडण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्याविरोधात नाशिक, पुणे आणि ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तीनही ठिकाणी राऊतांवर कलम 500 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.