शिर्डी : लॉकडाऊनमुळे मद्यप्रेमींना दारू मिळणं मुश्किल झालं आहे. त्यातच शिर्डीमध्ये बियरची गाडी पलटी झाल्यामुळे तळीरामांना लॉटरी लागली आहे. अहमदनगर-मनमाड महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. हा अपघात झाल्यानंतर अनेकांनी बियरच्या बाटल्या लंपास केल्या. गुहा गावातील ही घटना आहे. या अपघातामध्ये टेम्पो चालकाला किरकोळ जखम झाली आहे. गाडीमध्ये नेमका किती माल होता आणि किती रुपयांचं नुकसान झालं? याची माहिती पोलीस घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारपासून राज्यामध्ये दारूविक्री करायला परवानगी देण्यात आली. यानंतर राज्यात आज १२.५० लाख लिटर दारूची विक्री झाली. याची अंदाजे किंमत ४३.७५ लाख रुपये एवढी आहे. 


व्हॉट्सएपवर अपॉईंटमेंट घेऊन मिळणार दारु खरेदीची वेळ


सोमवारी दारूविक्री सुरू झाल्यानंतर मंगळवारपर्यंत राज्यात अंदाजे ६२.५५ कोटी रुपयांची दारूविक्री झाली. मंगळवारपर्यंत अंदाजे १६.१० लाख लीटर दारूची विक्री झाली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. सरकारने परवानगी दिल्यानंतर राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये दारूविक्रीला सुरुवात करण्यात आली. तर ९ जिल्ह्यांमध्ये दारूविक्री सुरू झाली नाही. प्रमाणाबाहेर गर्दी झाल्यामुळे लातूर आणि उस्मानाबादमध्ये दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.


मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजीचा सूर, मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 


गर्दीमुळे दारूविक्री बंद झालेले जिल्हे 


मुंबई, उस्मानाबाद, लातूर 


दारूविक्री सुरू असलेले जिल्हे 


पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, जळगाव, बुलडाणा


दारूविक्री बंद असलेले जिल्हे 


अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर, ठाणे