व्हॉट्सएपवर अपॉईंटमेंट घेऊन मिळणार दारु खरेदीची वेळ

गर्दी टाळण्यासाठी वाईन शॉप मालकांची अनोखी शक्कल 

Updated: May 6, 2020, 10:56 PM IST
व्हॉट्सएपवर अपॉईंटमेंट घेऊन मिळणार दारु खरेदीची वेळ  title=

मुंबई : दारु विक्रीला शासनाने परवानगी दिल्यानंतर मद्यपींनी दुकानांबाहेर रांगाच रांगा लावल्या. एका बाजुला कोरोनाचे रुग्ण वाढत असताना या वाढत्या रांगा म्हणजे धोक्याची होती. हे पाहता शासनाने तात्काळ आपला निर्णय मागे घेत काही ठिकाणी पुन्हा दारु बंदीचा निर्णय कायम ठेवला. पण आता वाईन शॉप मालकांनी यावर नवीन शक्कल लढवली आहे. 

दारुच्या दुकानांबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी वाईन शॉप मालकांची अनोखी शक्कल लढवली आहे. मद्यपींना अपॉइंटमेंट घेऊन दारुच्या बाटल्या खरेदी करता येणार येणार आहेत. यासाठी वाईन शॉपतर्फे व्हाट्सएप नंबर जाहीर करण्यात येणार आहे. 

या नंबरवर मद्यपींना दारु खरेदीची वेळ दिली जाणार आहे. त्यानुसार शुक्रवारपासून वाईन शॉप मधील विक्री पुन्हा सुरू होणार आहे. अशा प्रकारे वाईन शॉप सुरु ठेवण्यास नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली पुन्हा एकदा मंजुरी दिली आहे.

रुग्णांचा आकडा वाढला

महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात एका दिवसामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मागच्या २४ तासात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १,२३३ने वाढला आहे, तर दिवसात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६५१ एवढी झाली आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १६,७५८ एवढी झाली आहे. आजच्या दिवसात कोरोनाच्या २७५ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.