शिर्डी : साईमंदिराचे राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद हायकोर्टाने दिले आहेत. शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. महाविकासआघाडी सरकारने नेमलेले हे विश्वस्त मंडळ होते. ज्यामुळे महाविकासआघाडीला हा धक्का मानला जात आहे. साईसंस्थानच्या घटनेनुसार विश्वस्त मंडळाची नेमणूक झाली नसल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला होता.


पुढील आठ आठवड्यात नविन विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. राज्य सरकारला नविन विश्वस्त मंडळ नेमणार आहे. आघाडी सरकारने 16 सदस्यांची विश्वस्त मंडळावर नेमणूक केली होती. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा, उपाध्यक्ष शिवसेनेचा आणी विश्वस्त काँग्रेसचे असे मंडळात पदाचे वाटप करण्यात आले होते. पण आता नविन विश्वस्त मंडळाची नेमणूक होईपर्यंत जिल्हा न्यायाधीश साईमंदिराचा कारभार पाहणार आहेत.