शिर्डीत गुंडगिरी वाढली! भररस्त्यात धारदार शस्त्रांनी तरुणावर जीवघेणा हल्ला
Shirdi Crime : लाखो भक्त शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर दुसरीकडे याच शिर्डीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
Shirdi Crime News in Marathi: गेल्या काही दिवसांपासून शिर्डीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. ज्या शिर्डीतमध्ये जगभरातून साईबाबांच्या समाधीवर डोके टेकवण्यासाठी येतात. त्याच शिर्डीत दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. सोमवारी (19 फेब्रवारी) शिर्डीत तिघांनी एका तरुणावर तलवार तसेच चॉपरने हल्ला चढवला आहे. धक्कादायक बाब म्हणेज ही घटना साईबाबांच्या मंदिराजवळ घडली आहे.
शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या 4 नंबर प्रवेशद्वाराजवळील बाजारपेठात हा प्रकार घडला. या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत सूर्यकांत शशिकांत वाणी (वय 24) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या घटनेत पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपी निखिल महादेव सोनवणे, आर्यन राजकुमार पाटील, प्रदीप सुनील सोनवणे यांना अटक करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (19 फेब्रुवारी) सायंकाळच्या सुमारास सूर्यकांत साई मंदिराच्या 4 क्रमांकाच्या प्रवेशद्वारावरील बाजारपेठेत उभा होता. त्यावेळी आरोपी तेथे आला. त्यांनी वाद घालत सूर्यकांतवार तलवार तसेच चॉपरने हल्ला केला.
या घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, हातात तलवार घेऊन आरोपी बाजारात फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपास करून या तीन आरोपींना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिर्डीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या आरोपींचा योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका चहा विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.
चहा विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला
शिर्डीतील साईमंदिराच्या गेट नंबर एक समोर, सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चहा विक्रेत्यावर चाकून वार करण्यात आले आहेत. यात बाळासाहेब मोकाटे गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्या अंगावर अनेक ठिकाणी चाकूचे वार झालेले आहेत. यामुळे रक्तस्त्राव झाला आहे.