मुंबई : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उदघाटन होऊन चार दिवस होत नाहीत, तोच शिर्डी विमानसेवेचा गोंधळ सुरू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्याच दिवशी विमान रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळांबा झाला आहे.


पहिल्याच दिवशी प्रवाशांना हैदराबादला घेऊन जाणारं अलायन्स एअर इंडियाचं विमान रद्द करण्यात आलंय. हे विमान रद्द झाल्याची माहिती बराच वेळ प्रवाशांना देण्यातच आली नाही. या विमानानं ५२ भाविक हैदराबादला परत जाणार होते.


 संध्याकाळी साडे चारच्या सुमारास  विमानानं टेकऑफ करणं अपेक्षित होतं.  त्यासाठी प्रवासी विमानात बसलेही.... पण पुढचे चार तास प्रवाशांना विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली नाही.


चार तासांनी प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आलं. तांत्रिक कारणामुळे विमान रद्द झाल्याचं सांगण्यात आलं. पण इतका वेळ अलायन्स एअरलाईन्सनं प्रवाशांना  नीट माहिती न देता उद्धट भाषेत उत्तरं दिली. विमानतळावर खाण्यापिण्याचीही योग्य सोय नव्हती. त्यामुळे प्रवाशांना मनःस्ताप झाला आहे.