शिर्डीः सहजीवनाची स्मशानभूमीतून सुरुवात; अंधश्रद्धा झुगारात धुमधडाक्यात लावला विवाह, शिर्डीतल्या लग्नाची चर्चा
Marriage In Crematorium Rahata: जातीपातीची बंधने, अंधश्रद्धा झुगारुन एका जोडप्याने समाजाता नवा आदर्श निर्माण केला आहे. स्मशानभूमीतून सहजीवनाची सुरुवात केली आहे.
कुणाल जमदाडे, झी मीडिया
Ahmednagar Marriage Ceremony In A Crematorium: स्मशानभूमीचे (Crematorium) नाव ऐकूनही अंगावर शहारा येतो. ज्याभूमीत सतत रडण्याचे आवाज ऐकायला येतात तिथून मंगलाष्टकाचे (Marriage) सूर परिसरात ऐकू येऊ लागले. शिर्डी (Shirdi) येथे एक आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला आहे. या मुळं परिसरात एकच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (Ahmednagar Marriage Ceremony In A Crematorium)
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील स्मशानभूमीत हा आदर्श विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. वधू याच स्मशानभूमीत लहानाची मोठी झाली. त्यामुळं तिने त्याच भूमीत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. अंधश्रद्धेला मूठ-माती देत तरुणीने लग्नासाठी स्मशानभूमी निवडल्याने तिचे कौतुकही होत आहे.
जिथे मनुष्याच्या आयुष्याचा शेवट होतो ते ठिकाण म्हणजे स्मशानभूमी. त्या जागेत केवळ रडण्याचे सुर ऐकायला मिळतात आणि अंत्यसंस्कार बघायला मिळतात त्याच जागेत म्हणजेच स्मशानभूमीत एका जोडप्याने आपल्या सहजीवनाची सुरूवात केली आहे. स्मशानभूमीत गेल्या वीस वर्षापासून काम करणारे गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मुलीचा विवाह स्मशानभूमीतच लावला आहे. मनोज जयस्वाल आणी मयुरी गायकवाड असं या नवविवाहित जोडप्याचे नाव आहे.
स्मशानजोगी गंगाधर गायकवाड आणि पत्नी गंगुबाई गायकवाड यांना तीन मुली व एक मुलगा असून सर्वात लहान मुलगी मयुरी हिचा विवाह शिर्डी येथील मनोज जयस्वाल यांच्यासोबत ठरला होता. तसंच, हा विवाह अंतरजातीय होता. मयूरी आणि मनोज दोघांचेही शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. तेव्हा त्यांच्यात मैत्री झाली व नंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. पुढे जाऊन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांचाही विवाह स्मशानभूमीच्या प्रांगणात संपन्न झाला.
मनोज जयस्वाल आणी मयुरी गायकवाड यांच्या विवाहासाठी शहरातील मान्यवरही उपस्थित होते त्यांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नी ममता पिपाडा येदेखील उपस्थित होत्या. दामपत्याने नववधूचे कन्यादान करत मुलीला संसार उपयोगी भांडी भेट दिली आहेत. अंधश्रद्धेला मुठमाती देत पार पडलेला हा विवाह इतरांनाही प्रेरणा देणारा ठरणार आहे.
स्मशानभूमीला सगळेजण अशुभ मानतात. मात्र याच स्मशानभूमीत विवाहाचे सर्व संस्कार पार पडले. अगदी थाटामाटात दोघांचा विवाह लावण्यात आल. विषेश म्हणजे जातीपातीची बंधने झुगारून सुशिक्षित तरूणाने म्हसनजोगी समाजातील मुलीशी विवाह करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.