Shirdi Community Marriage : सर्वधर्म समभाव अशी शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत कोते दाम्पत्याच्या पुढाकाराने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले  होते. या सोहळ्यात तब्बल 41 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. विशेष म्हणजे कोते दाम्पत्याने स्वत:ला मुलगी नसताना जवळपास 2300 मुलींचे कन्यादान केले आहे. हा सामुदायिक विवाहसोहळा फक्त एका रुपयात आयोजित करण्यात आला होता. 


फक्त सव्वा रुपया शुल्क भरुन करता येईल नोंदणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्डीतील कैलास कोते आणि सुमित्रा कोते या दाम्पत्याला मुलगी नसल्याने त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून कन्यादान करण्याचा निश्चय केला आहे. गेल्या 23 वर्षांपासून कोते कुटुंबाकडून शिर्डीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाहसोहळा आयोजित केला जातो. या विवाह सोहळ्यात फक्त सव्वा रुपया शुल्क भरुन नोंदणी करता येते. कोते दाम्पत्याकडून वधू-वरांना नवीन पोशाख, सोन्याचे मंगळसूत्राची भेट, संसार उपयोगी वस्तू, वऱ्हाडी मंडळींना मिष्टान्न भोजन यांसह रोख रक्कम दिली जाते. यंदा या सामुदायिक विवाहसोहळ्यात 41 जोडपे मोठ्या थाटात लग्नबंधनात अडकले. 


स्वतःला मुलगी नसताना जवळपास 2300 मुलींचे कन्यादान


यंदा या सामुदायिक विवाहसोहळ्याचे 24 वे वर्ष आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून कैलास कोते आणि सुमित्रा कोते या दाम्पत्याने 2300 मुलींचे कन्यादान केले आहे. विशेष म्हणजे कोते दाम्पत्याने स्वतःला मुलगी नसताना जवळपास 2300 मुलींचे कन्यादान केले. यंदाच्या सामुदायिक विवाहसोहळ्यात नगर जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातून 41 जोडपे विवाहबंधनात अडकली आहेत.


विविध जिल्ह्यातून 41 जोडपे विवाहबंधनात


दरम्यान पंचक्रोशीतील विविध संत महंत आणि राजकीय मान्यवरांनी साई सिध्दी चेरिटेबल ट्रस्ट आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्याला हजेरी लावली होती. या माध्यमातून आम्ही राज्यातील जनतेला बेटी बचाव बेटी पढाओ असा संदेश देत आहोत, असे कोते दाम्पत्य म्हणाले. तर दुसरीकडे ज्या दाम्पत्याचा विवाहसोहळा पार पडला त्यांनी कोते कुटुंबाचे आभार व्यक्त केले. या विवाहसोहळ्याचे नियोजन अपेक्षेपेक्षाही छान करण्यात आले होते. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत, अशी भावना या विवाहसोहळ्यातील एका नववधू-वराने व्यक्त केली.