कुणाल जामदडे, झी मीडिया, शिर्डी: साईबाबांचे दर्शन (saibaba) घेण्यासाठी सगळेच भाविक उत्सुक असतात. त्यामुळे शिर्डीच्या परिसरात भक्तांची गर्दी (saibhakta) पाहायला मिळते. परंतु सध्या शिर्डीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शिर्डीत चिंतेचे वातावरण पसरले आहे. साईंच्या शिर्डीत साई भक्तांची लूट (looted) झालेली पाहायला मिळाली. पोलिस स्टेशन नजीक महिला साईभक्तांची लूट झाली आहे त्यामुळे शिर्डीत आता साईभक्त असुरक्षित आहेत की काय असा प्रश्न पडला आहे. हाकेच्या अंतरावर हे पोलिस स्टेशन (police station) असून महिला साईभक्ताची लूट झाली असून या घटनेत महिला जखमी झाली आहे. या महिलेची पर्स, मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले आहेत. दोन दुचाकीस्वारानी साईभक्त महिलेची पर्स (a woman's purse grabbed by a man) चोरली आणि नंतर त्यांनी मोबाईलवर डल्ला मारला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी साईनगरीत लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली असून पोलीस स्टेशन परिसरातच साई भक्तांची लूट झाल्याचा हा धक्कादायक प्रकार (shocking news) समोर आला आहे. 


साईंवरची श्रद्धा अपार : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साईंवर सर्वांचीच श्रद्धा आहे, अशाच एका महिलेच्या साईभक्तीनं लोकही आश्चर्यचकित झाली आहेत.आपल्या पतीच्या निधनानंतर हैद्राबाद येथील साईभक्त महिलेने अंगावरील सोन्याचे दागिने एकत्रित केलं. सर्व अलंकार एकत्र करत 7 लाख 10 हजार रुपये किंमतीचा 15.300 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार साईंचरणी अर्पण केला आहे. हैद्राबाद (hydrabad) येथील साईभक्त श्रीमती पोलावर्णम कल्याणी यांनी शिर्डीला येत साईंच्या चरणी नतमस्तक झाल्या. आपल्या अंगावरील दागिने एकत्रित केले. सोन्याचा हार बनवला. हा सोन्याचा हार (gold necklace) साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे सुपुर्त केला. साईबाबांनी प्रत्येक अडचणीतून मुक्त केलं. कृतार्थतेची भावना साईबाबांच्या चरणी अर्पित व्हावी म्हणून हैद्राबाद येथील साईभक्त महिलेने सोन्याचा हार साईबाबांच्या चरणी अर्पित केला आहे.


दिवाळीत भक्तांनी इतके पैसे केले दान : 


दिवाळीच्या (diwali) सुट्टीनिमित्तानं लाखोंच्या संख्येनं भावित साईंच्या शिर्डीत दाखल झाले होते. इथं सेवा देण्यासाठी म्हणून भक्तांनी दानपेटीमध्ये आपआपल्या परिनं दान केलं. 15 दिवसांमध्ये दानाच्या रकमेचा हा आकडा 18 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. बाबांच्या चरणी भक्तांनी केलेल्या दानामध्ये जवळपास 29 देशांमधील 24 लाख 80 हजार रुपयांच्या परकीय चलनाचा समावेश आहे. तर, तब्बल 39 लाखांहून अधिक किमतीचं 860.450 ग्रॅम सोनं आणि 5 लाखांहून अधिक किमतीची 13345 ग्रॅम चांदी आहे. 


इतकी भरली साईबाबांची तिजोरी : 


श्री साईबाबा संस्थानच्या दान पेटीत मागील 11 महिन्यात 398 कोटी 53 लाख 31 हजार 500 अकरा रुपयांचे दान जमा झाले आहे. दीड कोटीहून अधिक भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले आहे. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबांच्या दानपेटीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्षात सर्वंच मंदिर बंद होती. साईबाबा मंदिर (saibaba mandir) देखील एक वर्षापेक्षा जास्त दिवस बंद होते. कोरोनाचा प्रादुर्भाव (corona) मागील वर्षी कमी झाला. यानंतर साईमंदिर दर्शनासाठी खुल झालं होत. तेव्हापासून आतापर्यंत साईचरणी 398 कोटींचे दान जमा झाले आहे. साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची याबाबत माध्यमांना माहिती दिली.