साईंबाबांच्या शिर्डीतील समाधीला शंभर वर्ष पूर्ण
साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 ला आपला देह ठेवला.
प्रशांत शर्मा, झी मीडिया, मुंबई : सर्वधर्म समाभावाची शिकवण देणाऱ्या शिर्डीच्या साईंबाबांच्या महानिर्वाणास शंभर वर्ष पुर्ण होतायत. त्यानिमित्ताने शिर्डीत शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे साठ वर्षांचा काळ शिर्डीत वास्तव्य करणाऱ्या साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 ला आपला देह ठेवला.
जल्लोषात साजरा
साई समाधी शताब्दी वर्षानिमित्ताने मुंबईतील द्वारकामाई मंडळात ब्रम्हांडनायक देखाव्याचे आकर्षण पाहायला मिळतंय.
रामनवमी, गुरूपौर्णिमा आणि दसरा या मंडळातर्फे जल्लोषात साजरा केला जातो.