शिर्डी : कोरोना व्हायरस प्रादुर्भाव टाळण्यासाठी 17 मार्चपासून साईबाबा मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे. भक्तांना दर्शनासाठी मंदिर प्रत्यक्ष बंद असलं तरी, ऑनलाईन दर्शन मात्र सुरु आहे. ऑनलाईन दर्शन आणि देणगी सुरु असल्याने लॉकडाऊमध्ये भक्तांनी साई चरणी घरबसल्या 17 दिवसांत तब्बल 1 कोटींहून अधिक देणगी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. 17 मार्चपासून साईबाबांचं समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलं आहे. मंदिर बंद असतानाही 3 एप्रिलपर्यंत साईभक्‍तांकडून ऑनलाईनद्वारे 1 कोटी 90 हजार 201 रुपये देणगी देण्यात आल्याचं संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं आहे.


साईबाबांचा महिमा व त्‍यांची शिकवणूक संपूर्ण जगात पोहचली असून साईबाबांचे भक्‍त देशासह परदेशातही मोठ्या प्रमाणात आहे. 17 मार्चपासून मंदिर बंद ठेवण्‍यात आलं असून याकाळात टाटा स्‍कॉय, संस्‍थान संकेतस्‍थळ आणि मोबाईल अॅपद्वारे थेट ऑनलाईन दर्शनाचा लाभ साईभक्‍त घरबसल्‍या घेत असल्याचं डोंगरे यांनी सांगितलं.