कुणाल जमदाडे,  झी मीडिया, शिर्डी - अहमदनगर : शिर्डी येथील साईबाबा लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. साई बाबांची झोळीत भक्त भरभरुन दान टाकतात. सोन्या, चांदीचे मौल्यवान दागिने तसेच रोकड नेहमीच साई चरणी दान केली जाते. साई चरणी अनोखे दान आले आहे. एका भक्ताने शिर्डीच्या साई चरणी 75 लाखाच्या इमारतीचे दान केले आहे. नवी कोरी इमारत साई संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्डीच्या साईंच्या चरणी दानाचा  ओघ सुरू असून बेंगलोर येथील दानशुर साईभक्‍त माकम कुटुंबाने हे अनोखे दान केले आहे.  शामला जयप्रकाश माकम, दिलीप जयप्रकाश माकम,  विनोद जयप्रकाश माकम यांच्या परिवाराने ही इमारत दान केली आहे.  


वडिलांची इच्छा पूर्ण केली


दिलीप माकम यांच्या  वडिलांची शिर्डीत शाळा बांधण्याची इच्छा होती. दिलीप माकम यांनी वडिलांची इच्छा पूर्ण केली आहे. दिलीप माकम यांनी शाळेसाठी साडे तीन गुंठा जागेत जवळपास 75 लाखांची इमारत साई संस्थानला दान स्वरूपात दिली आहे. शाळेसाठी बांधलेली इमारत साईभक्त परिवाराने साई संस्थानकडे सुपूर्द केली आहे. 


मुलांसाठी शाळा बांधली


दिलीप माकम यांनी शिर्डी साकुरी शिवाजवळ ही दोन मजली इमारत बांधली. बेंगलोर येथील देणगीदार साईभक्त परिवाराचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुळे यांच्याकडून शाल डायरी देऊन सत्कार करण्यात आला. शिर्डी मध्ये शाळा बांधून चालवण्याची माझ्या वडिलांची इच्छा होती ती आम्ही पूर्ण केली असून साडेतीन गुंठे जागेमध्ये इमारत बांधली असून साई संस्थानला दान दिली असून वडील 20 वर्ष साईबाबांची मनोभावे सेवा करत होते अस देखील मुलगा दिलीप माकम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


शिर्डीच्या साई मंदिरातील मूर्तीची झीज होतेय


शिर्डीच्या साई मंदिरातील मूर्तीची दिवसेंदिवस झीज होतेय, काळजी न घेतल्यास भविष्यात मूर्ती गुळगुळीत होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलीय. 1952 साली समाधी मंदिरात साई मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मात्र इटालियन मार्बलची ही मूर्ती दिवसेंदिवस झिजत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केलाय. मूर्तीचं थ्रीडी स्कॅनिंग करुन डेटा संरक्षित करण्याची गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.