शिर्डीत साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन
सलग नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
शिर्डी : श्रावण महिन्यानिमित्त शिर्डीत साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सलग नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दरवर्षी साईबाबा संस्थान आणि नाट्यरसिक मंचाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा या सोहळ्याचे 25वे वर्ष आहे.
श्रावन महीना सुरु झाला की, सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांची सुरवात होते. शिर्डीतही तीन मुख्य उत्सवानंतर साईचरित्र पारायण सोहळा महत्वाचा उत्सव असतो. नऊ दिवस चालणाऱ्या या पारायण सोहळ्यास आज मोठ्या भक्तीभावाने सुरवात झाली.
साई चरित्र पारायण सोहळ्यात 7 हजाराहुन अधिक भाविकांनी सहभाग घेतला आहे.
नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यादरम्यान महिलांच्या हळदीकुंकु कार्यक्रमासोबत अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पारायण समाप्तीच्या दिवशी होणारी शोभा मिरवणूक हे या सोहळ्याचे खास वैशिष्ट्ये आहे.