कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : फकीर अशी शिर्डीच्या साईबाबाची(Shirdi Saibaba ) ओळख. मात्र, भक्तांची भरभरुन दान करत साई बाबाची तजोरी भरली आहे. साई बाबाच्या दानपेटीत 11 महिन्यात 398 कोटी 53 लाखांचे दान जमा झाले आहे. महाष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून आणि परदेशातूनही भक्त साई बाबांच्या दर्शनासाठी येतात. हे भक्त साईच्या चरणी सोन्या, चांदीचे दागिने तसेच मोठ्या प्रमाणात पैशांच्या स्वरुपात दान करत असतात.   


दीड कोटीहून अधिक भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री साईबाबा संस्थानच्या दान पेटीत मागील 11 महिन्यात 398 कोटी 53 लाख 31 हजार 500 अकरा रुपयांचे दान जमा झाले आहे. दीड कोटीहून अधिक भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले आहे. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबांच्या दानपेटीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 


कोरोना महामारीमुळे दोन वर्षात सर्वंच मंदिर बंद होती. साईबाबा मंदिर देखील एक वर्षापेक्षा जास्त दिवस बंद होते. कोरोनाचा प्रादुर्भाव मागील वर्षी कमी झाला. यानंतर साईमंदिर दर्शनासाठी खुल झालं होत. तेव्हापासून आतापर्यंत साईचरणी 398 कोटींचे दान जमा झाले आहे. साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची याबाबत माध्यमांना माहिती दिली.