साईंच्या दर्शनासाठी बायोमँट्रीक पद्धतीत गोंधळ
ही पध्दत भाविकांचा त्रास कमी करण्या एवजी वाढवणारीच ठरत आहे.
शिर्डी : साईदरबारी दर्शनासाठी येणार्या साईभक्तांच्या सोयी साठी साईबाबा संस्थाने बायोमँट्रीक दर्शन पध्दत सुरु केली.
मात्र ही पध्दत भाविकांचा त्रास कमी करण्या एवजी वाढवणारीच ठरत आहे.
पासेस देताना गोंधळ
या पध्दती द्वारे दिले जाणारे पासेस देतांना गोंधळ होत असल्याचे समोर आले आहे. त्यामूळे संस्थानने ही पध्दत का सुरु केली हा प्रश्न उपस्थीत होतोय.
केंद्राचे पैसे खर्च
दुसरीकडे प्रत्येक सामान्य भाविकाच्या दर्शनासाठी केंद्र सरकारचे जवळपास पावणे दोन रूपये खर्ची पडत असल्याच दिसुन आले आहे.