सातारा : साता-यातील प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतापगडावर शिवरायांनी अफजल खानाशी दोन करुन त्याचा खात्मा केला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करुन देणारा दिवस म्हणून दरवर्षी हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पालखीसह मिरवणूक काढण्यात आली. 


यावेळी शिवरायांच्या जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं. लेझीम-तुताऱ्या, काठीवर चालणारी मुले आणि चित्तथरारक मर्दानी खेळांनी वातावरणात नवा जोष संचारला होता. या नेत्रदिपक सोहळ्याला शिवप्रेमी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठी गर्दी केली होती.