मुंबई : Shiv Sena aggressive : राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीबाहेर दाखल झाले आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांची फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, पोलिसांनी घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेटिंग केले आहे. मात्र, पोलिसांची बॅरिकेट्स बाजूला सारत राणांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठा गोंधळ झाला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी वेळीच शिवसैनिकांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी तणाव कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणांच्या घराबाहेर शिवसैनिकांचा कडा पहारा देत आहेत. तसेच मातोश्रीबाहेर महिला शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. पोलिसांनी घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग केले आहे. दरम्यान, थोड्याच वेळात राणा दाम्पत्य घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचं पठण करणारच, यावर राणा दाम्पत्य ठाम आहे. तर चालीसानंतर प्रसाद देण्याची परंपरा, असे सांगत शिवसेना नेत्यांचा राणांना धमकी वजा इशारा दिला आहे. 



तर दुसरीकडे अमरावतीतून राणा समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात हनुमान चालीसा पठणासाठी मातोश्रीकडे रवाना होणार आहेत. मात्र, मातोश्रीबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्याचवेळी  राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीबाहेर दाखल झाले आहेत. राणांना रोखण्यासाठी शिवसैनिकांची फिल्डिंग लावली आहे. राणांच्या घराबाहेर शिवसैनिकांचा कडा पहारा आहे. तर मातोश्रीबाहेर महिला शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.