पेट्रोल, घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेनं आंदोलन
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचं यावेळी शिवसेनेनं आरोप केला.
नागपूर : राज्यभरात पेट्रोल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेनं आंदोलन केलं. नागपूरमध्ये शिवसेनेनं मोर्चा काढला.
पक्षाच्या रेशीमबाग कार्यालयजवळून सुरू झालेला मोर्चा कॉटन मार्केटमध्ये पोहचल्यानंतर तिथे कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.
तर कोल्हापूरातही शिवसेनेनं महागाईचा राक्षस करून अनोखं आंदोलन केलं. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी शेणी पेटवून महागाईची होळी केली.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचं यावेळी शिवसेनेनं आरोप केला.