सिंधुदुर्ग : शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपमध्ये (BJP) पुन्हा जोरदार राडा पाहायला मिळाला. (Shiv Sena-BJP rada in Sindhudurg) सिंधुदुर्गमध्ये ( Sindhudurg)) शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर हा राडा झाला. शिवसेनेच्या पेट्रोल वाटप कार्यक्रमावरून सेना-भाजपमध्ये वाद उफाळला. भाजपचे ओळखपत्र दाखवा एक लीटर पेट्रोल मोफत मिळवा, अशी ऑफर आमदार वैभव नाईक यांनी आज सुरु केली. शिवसेना वर्धापनदिनी पेट्रोल वाटपाची शिवसेनेची ही ऑफर होती. याच ऑफरवरून सेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आणि गोंधळ निर्मा झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई येथील शिवसेना भवनाच्या समोरील भाजप-शिवसेनेच्या राड्यानंतर आता पुन्हा एकदा सिंधुदुर्गमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणावात भर पडली. त्याच झालं असं की आज शिवसेनेचा वर्धापनदिन होता त्याचं औचित्य साधून कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी 100 रुपयात दोन लिटर पेट्रोल तर भाजपचं कार्ड असेल तर एक लीटर पेट्रोल फ्री दिले जाईल अशी घोषणा केली. 


ही घोषणा राणे यांच्या कुडाळ येथील पेट्रोल पंपावर केली. त्यामुळे सकाळीच पेट्रोल भरण्यासाठी नागरिक दाखल झाले. आमदार वैभव नाईक देखील पेट्रोलचे उरलेले पैसे देण्यासाठी कुडाळ पंपात आले. त्याचवेळी भाजपचे कार्यक्रते देखील त्याठिकाणी दाखल झाले. त्यामुळे शिवसेनेच्या पेट्रोल वाटप कार्यक्रमावरून सेना-भाजपमध्ये वाद झाला. अखेर याठिकाणी पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केला. असे असताना देखील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे समोरासमोर आले आणि राडा झाला. 


अखेर पोलिसांनी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यानंतर शिवसेना-भाजपच्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. भाजपमुळे आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव शंभरीकडे पोहोचले आहेत. त्यामुळे महागाईत वाढ झाली आहे. तर हे दर राज्य सरकारमुळे वाढल्याचे भाजपचे म्हणणे आहे. यावरील कर कमी केला तर दर कमी होईल, असे भाजपचे म्हणणे आहे.