Shivsena Symbol : `व्हॅलेंटाईन डे दिवशी शिवसेनेच्या `ब्रेकअप`ची सुनावणी; धनुष्यबाण आणि 16 आमदारांच्या पात्रतेचा वाद
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? शिंदे आणि ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्षाचा फैसला सुप्रिम कोर्ट करणार.
Shiv Sena Symbol Row on valentine day 2023: 'व्हॅलेंटाईन डे (valentine day 2023) दिवशी शिवसेनेच्या 'ब्रेकअप'ची सुनावणी होत आहे. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आणि 16 आमदारांच्या पात्रतेचा मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण (Shiv Sena Symbol) चिन्हं यावर काय निर्णय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. शिवसेना पक्षावर दावा करण्यासह शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात जोरदार रस्सीखेच पहायला मिळत (Maharashtra Political News) आहे.
शिंदे सरकारचं काय होणार याचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे. कारण शिवसेनेच्या 'ब्रेकअप'ची सुनावणी 'व्हॅलेंटाईन डे'ला म्हणजे 14 फ्रेबुवारीला होत आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात शिवसेना कोणाची यावरुन वाद सुरु आहे. त्यावर दोन्ही गटांची सुप्रीम कोर्टात याचिका केल्या आहेत.
तसेच 16 आमदारांचा अविश्वास ठराव आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव याभोवती प्रामुख्यानं ही सुनावणी फिरत आहे. खुद्द मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारकीविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिंदेंना घेरायचं, इतर 15 आमदारांना अपात्र ठरवायचं आणि सरकार अल्पमतात आणायचं अशी ठाकरेंची रणनीती आहे. सुप्रीम कोर्टात उद्या सकाळी 10.30 वाजता यावर सुनावणी होणार आहे. तेव्हा राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट भाजपने विकत घेतलं आहे का? संजय राऊतांचा सवाल
केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट भाजपने विकत घेतलं आहे का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. आपण कायद्यानुसारच सरकार स्थापन केलं असल्याने निकाल आपल्याच बाजूने लागेल असं विधान फडणवीसांनी केलं होतं. त्यावर राऊतांनी हा सवाल केला.
धनुष्यबाण परत आणायचाच, पटोलेंचा निर्धार
आपल्याला धनुष्यबाण परत आणायचाय, धनुष्यबाण कसा आणायचा तो प्लॅन आम्ही करु असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय. पिंपरी पोटनिवडणुकीतील उमेदवार नाना काटे यांच्यासाठी आज मविआची सभा झाली. या सभेत आदित्य ठाकरेंसमोर नाना पटोलेंनी हे विधान केलंय.
उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं त्याचा बदला घ्यायचा - अजित पवार
मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं, त्याचा बदला आपल्याला पोटनिवडणुकीत घ्यायचाय, असं अजित पवारांनी म्हटलं. आज चिंचवडमध्ये मविआचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी मविआचा मेळावा झाला. या मेळाव्याला नाना पटोले, अजित पवार, आदित्य ठाकरे उपस्थित होते.