नागपूर: भाजप हा बलवान पक्ष असल्यामुळेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला आमच्याविरोधात एकत्र यावे लागले, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते रविवारी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात आमच्याविरोधात तीन पक्ष एकटवले याचा अर्थ आम्ही बलवान आहोत. या तिन्ही पक्षांच्या विचारात ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी गडकरी यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले. बांगलादेशी नागरिकांना मुंबईतून हाकलायला पाहिजे, ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. मात्र, आता शिवसेना राष्ट्रीय नागरिक नोंदणी ( NRC) आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी माणूस हे मुद्दे सोडून दिले. त्यामुळे लोक शिवसेनेवर नाराज आहेत. 


थोडीसी नाराजी, पण पाच वर्षे सरकार चालवाचे आहे - बाळासाहेब थोरात


शिवसेना स्वातंत्र्यवीर सावकरांना मानते. मात्र, तरीही काँग्रेस पक्षाकडून त्यांच्याविरोधात वक्तव्ये करण्यात येतात. शिवसेनेला सत्तेसाठी दुर्बलता व लाचारी पत्करावी लागत आहे. स्वत:चे विचार सोडावे लागत आहेत, अशी टीकाही यावेळी नितीन गडकरी यांनी केली. 


मुस्लीम धर्म स्वीकारणाऱ्या हिंदूंना आरक्षणाचा लाभ नाही - केंद्र सरकार