मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर रात्री तब्बल दोन तास बैठक, पाहा काय ठरलं !
Maharashtra Political Crisis : राज्यातील राजकीय घडामोडीला मोठा वेग आला आहे. बंडखोरांना बाहेरचा रस्ता शिवसेनेने दाखविल्यानंतर आता राजकारणाला मोठी गती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर रात्री तब्बल दोन तास बैठक झाली.
मुंबई : Maharashtra Political Crisis : राज्यातील राजकीय घडामोडीला मोठा वेग आला आहे. बंडखोरांना बाहेरचा रस्ता शिवसेनेने दाखविल्यानंतर आता राजकारणाला मोठी गती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर रात्री तब्बल दोन तास बैठक झाली.(CM Uddhav Thackeray and Sharad Pawar meeting on Matoshri ) या बैठकीत काय घडले याची माहिती मीडियासमोर आलेली नाही. मात्र, सत्ता टिकवायची यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
मातोश्रीवर झालेल्या मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्या दोन तासांच्या बैठकीत बंडखोर आमदारांच्या निलंबनाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना खासदांसोबतही ठाकरे यांनी स्वतंत्र चर्चा आहे.
मातोश्रीवर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल रात्री तब्बल दोन तास बैठक झाली. सरकार वाचवण्यासाठी आता थेट शरद पवारच मैदानात उतरलेत. शेवटपर्यंत सरकार आपण टिकवणारच, असा विश्वास पवार यांनी ठाकरेंना दिल्याचं समजत आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींचा यावेळी आढावा घेण्यात आला.
शिवसेनेने 16 आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या आणखी 4 आमदारांच्या निलंबनाचा अर्ज शिवसेनेनं सादर केला आहे. गुरुवारी शिवसेनेचे 12 आमदार निलंबित करण्याचं पत्र गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना दिलं होते. आता 16 आमदारांचा समावेश आहे.