मुंबई : Deepak Kesarkar on Aditya Thackeray : आम्ही वेगळे होत इतर पक्षात गेलो असतो, पण शिवसेना पक्षावर आमचे प्रेम आहे. आम्ही गद्दारी करु शकत नाही. आमदारकी पणाला लावली. बाळासाहेब यांचे हिंदुत्व आम्ही मानतो. उद्धव ठाकरे आजारी असताना बंड केले नाही, यापूर्वी भूमिका मांडली होती. आता यात्रा का काढतां. आधी सामान्य लोकांना भेटत होते का, असा सवाल करत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादा भुसे, संदीपान भुमरे यांनी शिवसेनेसाठी जेलमध्ये गेले का ? एका नेत्यांनी शिवसेना उभी केली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण बाकीचे नेत्यांनी साथ दिली ही वस्तुस्थिती आहे. संदीपान भुमरे पाचवेळा आमदार झाले, पण मंत्री पदासाठी आग्रही राहीले नाही. ताठ मनाने उभे राहिले. पक्षनिष्ठेवर प्रश्न चिन्ह उपस्थितीत करणे चुकीचे आहे. तुम्ही किती ही यात्रा काढा, असा टोला आदित्य ठाकरे यांनी केसरकर यांनी हाणला. 


एकनाथ शिंदे यांनी कधीच कोणती मागणी केली नाही. तरी बदनामी त्याची का केली जाते. एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा, मी येतो असे उद्धव ठाकरे सांगतात. असे जर बोलत असतील तर आमच्या सारख्यांचे काही खरं नाही. अनिल परब यांच्या फोनवरुन ठाकरे यांनी फोन केला. हे चेक करावे, असे केसरकर म्हणाले. 


नारायण राणे यांच्यासोबत जे गेलेत ते निवडून आलेत. आम्हाला कोणी निवडणूक लढविण्याबाबत आव्हान देऊ नका. आमच्या नेत्यांचे अस्तित्व आहे. अस्मिता जागी झाली तर माणूस उठून उभा राहिल, तुम्ही अजून लहान आहात. ते तरुण आहेत, उद्धवसाहेब यांच्याकडून शिकावे, आम्ही आदर करतो. तुम्ही मंत्री पदावर असताना काय केले हे सांगावे, अशी टीका केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. 


दरम्यान, सुहास कांदे यांना विकास निधी का दिला गेला नाही. कदाचित ते त्यामुळे बोलत असतील. शिवसंवाद यात्रा येणारे शिवसेनेचे आहेत हे त्यांना कोठे माहित आहे.  नेमके सैनिक आहेत का राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांना केसरकर यांनी हाणला. 


तुम्ही अडीच वर्षाने सीएम पद जाणार होते, पण आता शिंदे यांच्या रुपाने सीएम पद शिवसेनेकडेच राहीले. शिंदे यांनी केले म्हणून चुकीचं , भावनात्मक आवाहन केले जाते हे चुकीच आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना बंड केले नाही, यापूर्वी भूमिका मांडली होती. आता यात्रा का काढतां आधी सामान्य लोकांना भेटत होते का, असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.