नागपूर: काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सेक्युलर पक्ष आहेत. शिवसेनेसोबत सरकार चालवायचे झाल्यास ते धर्मनिरपेक्ष पद्धतीने चालेल, यासाठी आग्रह धरु असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. ते शुक्रवारी नागपूर येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, शिवसेना हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष आहे. पण सरकार चालवताना शिवसेनेनंही सेक्युलर व्हावं, असा आमचा आग्रह असेल असे पवारांनी सांगितले. त्यामुळे आता ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरु आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या विचासरणीत असलेल्या मुलभूत फरकामुळे ही चर्चेचे गाडे फार हळूहळू पुढे सरकत आहे.  


इतक्यात सरकार स्थापन होणार नाही; आणखी थोडा वेळ लागेल- पवार


सध्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून किमान समान कार्यक्रमाची आखणी सुरु आहे. जेणेकरून सरकार स्थापन झाल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीत कोणतेही हेवेदावे होणार नाहीत. त्यामुळे या किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींची मोहोर उमटल्यानंतरच सर्वजण राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी जातील. 


सेनेचा मुख्यमंत्री शपथ घेताना स्टेजसमोर बसू द्या; शेतकऱ्याच्या मागणीवर उद्धव ठाकरे म्हणाले...


दरम्यान, महाशिवआघाडी असे संबोधल्या जाणाऱ्या या सरकारचा शपथविधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी म्हणजे १७ नोव्हेंबरला होण्याची शक्यता होती. मात्र, शरद पवार यांनी सरकार स्थापनेसाठी आणखी थोडा वेळ लागेल, असे सांगितल्याने शपथविधी लांबणीवर पडल्याचे सांगितले जाते.