नागपूर : सत्तेत आल्यावर आरेला विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा डाव आहे, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलाय. आरेला जंगल घोषित करू असं आश्वासन शिवसेनेनं दिलं होतं. मात्र आता आदिवासी पाटे स्थलांतरीत करून हा पट्टा खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा घाट शिवसेनेनं घातल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज विधानसभेत पुरवणी मागण्यांवर बोलताना शिवसेना सदस्य रविंद्र वायकरांनी आरेतील आदिवासी पाडे आणि विविध ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामं पुनर्विकासीत करण्यासाठी निवासी आरक्षणाची मागणी केली. 


त्यावर आशिष शेलार अतुल भातखळकर यांच्यासह अन्य सदस्यांनी आक्रमकपणे आरेतील भूखंड हडप करण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला. 


शिवसेनेने सत्तेत येताच आरे कारशेडच्या बांधकामाला स्थिगिती दिली आहे, त्यानंतर भाजपाकडून शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे.