मुंबई : नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारे सरकारमधले ज्येष्ठ मंत्री गिरीष बापटांनी यावेळी भाजपला अवाक् करणारं विधान केलंय. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बापट यांना चिमटा काढला आहे. 


‘बापट अस्सल पुणेकर’


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘गिरीश बापट अस्सल पुणेकर आहेत, जुने नेते आहेत ते कधीही खोटं बोलत नाही, त्यांच्या जे पोटात होते ते ओठांवर आलेय’, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. 


‘हिंदुत्ववादी संघटनावर आरोप करणे चुकीचे’


पुण्यातील एल्गार सभेत उमर खालिद ला का बोलविण्यात आले याची चौकशी करा. हिंदुत्ववादी संघटनावर आरोप करणे चुकीचे, महाराष्ट्र जातीपातीत फाटला जातोय हे धोकादायक, कोरेगाव कोरेगाव प्रकरण हाताळण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत, पंतप्रधान यांनी भाष्य करण्याची गरज नाही’, असेही ते म्हणाले. 


कृषीसाठी स्वतंत्र बजेट असावे


देशातलं कृषीसंकट खूप मोठं असून दिवसाला 2 हजार शेतकरी संपत आहे. त्यामुळे संसदेचे वीस दिवसांचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केलीय. त्यांच्या या वक्तव्याचे स्वागत संजय राऊत यांनी केले. तसेच कृषी खात्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने स्वतंत्र बजेट सादर करावे, ही शिवसेनेची मागणी असल्याचेही म्हणाले.


‘त्यांनी टोलवा टोलवी ची उत्तरे देऊ नये’


तसे त्यांनी मुंबईच्या आगीच्या घटनांवरही प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुंबईत लोकसंख्येचा स्फोट होतोय म्हणून आगीच्या घटना घडतायेत’, असे ते म्हणाले. तर भ्रष्टाचारी अधिका-यांची चौकशी करण्यास टाळाटाळ होत आहे, यावर ते म्हणाले की, ‘राम शिंदे आणि गिरीश महाजन हे दोन्ही बिहारचे मंत्री नसून महाराष्ट्रचे मंत्री आहेत, त्यांनी टोलवा टोलवी ची उत्तरे देऊ नये’, मुख्यमंत्र्यांनी यात गंभीरतेने लक्ष घालावे’, असे ते म्हणाले.