भरत गोगावलेंनी सोडली मंत्रीपदाची आशा, `आता विस्तार झाला तरी कोणी घेणार नाही`
MLA Bharat Gogavle On Minister Post: भरत गोगावलेंनी मंत्रीपदाची आशा सोडलीय, असे दिसते आहे.
MLA Bharat Gogavle On Minister Post: शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मोठा गट एकनाथ शिंदेंसोबत गेला. त्यानंतर अनेकांना केंद्रात, राज्यात मंत्रीमंडळ मिळेल अशी आशा होती. पण त्यातील अनेकांची इच्छा अद्यापही पूर्ण झालेली नाही. महाडचे आमदार भरत गोगावले हे त्यातीलच एक नाव आहे. आपल्याला मंत्रिपद मिळणार, हे अनेकदा त्यांनी बोलून दाखवलंय. पण मंत्रीपद त्यांना नेहमी हुलकावणी देत आलंय. आता विधानसभा निवडणुका तोडांवर आल्या. कधीही निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. अशावेळी भरत गोगावलेंनी मंत्रीपदाची आशा सोडलीय, असे दिसते आहे.
आपण मंत्री नक्की होणार
आपण मंत्री नक्की होणार असे सातत्याने सांगणारे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आता मंत्री पदाची आशा सोडून दिलीय. आता काही मंत्री मंडळ विस्तार होत नाही आणि झाला तरी कुणी घेणार नाही.
आपण पुढील मंत्रीमंडळात मंत्री असू
या मंत्रिमंडात स्थान नसले तरी पुढील मंत्रीमंडळात आपण मंत्री असू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पुढील म्हणजे ऑक्टोबरच्या 5 तारखेला आचार संहिता जाहीर होऊन 10 किंवा 12 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होतील , असं सूतोवाच गोगावले यांनी केलंय.