मुंबई : विरोधकांच्या वाढत्या हालचाली, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे जाण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक विधान भवनात झाली. त्यानंतर काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली. यावेळी नाना पटोले यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे समजते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार विरोधी पक्षांबाबत षडयंत्र रचत असल्याचा आरोप केला. तसेच, राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांची एका पाठोपाठ एक नावे घेत आरोप केले. एक, दोन पेन ड्राईव्ह देत सभागृहात आरोपांची माळ पेटविली.


देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोलीस चौकशीसाठी गेले त्यावरूनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. विरोधक सरकारवर आरोप करत असताना टीका करत असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार मात्र शांत होते.


सरकारवर विशेषतः मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका होत असताना फडणवीसांचे आरोप हाणून पाडण्यासाठी एकही मंत्री किंवा आमदारांने तोंड उघडले नाही.  त्यानंतर गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या उत्तराकडे साऱ्यांच्या नजर लागून राहिल्या असताना त्यांनीही आपल्या शांत स्वभावाप्रमाणे खुलासा केला.


नेमकी हीच बाब नाना पटोले यांना खटकली आहे. विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणे सोडाच पण शांत भूमिका घेतल्यास कसे होणार? यामुळे विरोधकांना आपणच मोठे करत आहोत याकडे पटोले यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.