जळगाव : हॉटेलला परमिट रुम केल्यामुळे व्यवसाय वाढतो असं धक्कादायक वक्तव्य पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. जळगावमध्ये युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील यांनी हॉटेल व्यवसाय करतानाचे स्वत:चे अनुभव सांगत परमिट रुममुळे माझा व्यवसाय वाढल्याचं वक्तव्य केलं आहे.