रत्नागिरी : Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर  (Shivsena leader Eknath Shinde Revolt) शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दापोलीचे आमदार योगेश कदम शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दरम्यान, आमदार भास्कर जाधव  (Bhaskar Jadhav) हे नॉट रिचेबल झाल्याने चर्चा सुरु झाली. मात्र, भास्कर जाधव हे चिपळूणमध्ये आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुहागरचे आमदार भास्कर जाधव चिपळूणमध्ये आहेत.भास्कर जाधव नॉट रिचेबल असल्याची माहिती निराधार आहे. जाधव यांच्या विश्वासू सहकाऱ्याने 'झी 24तास'ला माहिती दिली आहे. जाधव शिंदे गटात सहभागी झाल्याची माहिती ही निराधार आहे, असे सांगण्यात आले आहे. 


एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आठ ते नऊ जिल्ह्यांतील शिवसेनेचे आमदार गळाला लागले आहेत. कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल असल्यामुळे शिवसेनेला आणखी एक धक्का बसल्याची चर्चा सकाळपासून रंगली होती. जाधव हे गुवाहाटीला निघून गेले, ही निव्वळ अफवा असल्याचे सांगण्यात आले.